रोहित शर्मा आणि रितिकाला कन्यारत्न 

नवी दिल्ली – भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने रात्री उशिराने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. या वृत्ताला दुजोरा रितिका शर्माची चुलत बहीण आणि दिग्दर्शक सोहेल खानची पत्नी सीमा खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. दरम्यान, रोहित आणि रितिकाचे लग्न १३ डिसेंबर २०१५ रोजी झाले होते.

रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून हे वृत्त समजताच तो मुंबईला परतला आहे. यामुळे आता मेलबर्न येथील कसोटी सामन्यात रोहित शर्माची जागा हार्दिक पांड्या घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)