रोहित शर्माला “भारत अ’ संघातून विश्रांती

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थापनाचा निर्णय 
नवी दिल्ली, दि. 15 – इंग्लंड मालिके पाठोपाठ भारतीय संघाने आशिया चषक आणि वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका खेळल्यानंतर आता आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु असताना भारत अ संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेला जाणार असून या मालिकेत भारतीय अ संघातून संघातील महत्वाचे खेळाडू सहभागी होणार होते. मात्र, यावेळी भारत अ संघातून कसोटी संघात पुनरागमनाच्या प्रयत्नात असणाऱ्या रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णाय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

नुकतीच पार पडलेली विंडीजविरुद्धची मालिका अन्‌ आगामी खडतर ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता रोहित शर्माला भारतीय ‘अ’ संघातून विश्रांती देण्यात आली आहे. भारत “अ’ संघात रोहितचा समावेश करण्यात आला होता. रोहित सोबतच या संघात अजिंक्‍य रहाणे, मुरली विजय, हनुमा विहारी, पार्थिव पटेल आणि पृथ्वी शॉ याचाही समावेश आहे. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. भारत “अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याकडे लक्ष वेधले असून या दोन्ही देशातील वातावरज़्ण जरी सारखे नसले तरी येथे खेळल्याचा फायदा निश्‍चीतच भारतीय संघातील खेलाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणार आहे. असेही द्रविड म्हणाले होते.

मात्र, बीसीसीआयचा हा निर्णय चाहत्यांना पटलेला दिसला नाही. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रोहितला चार दिवसीय सामन्यात खेळवायला हवे होते अशी मत चाहत्यांनी ट्‌वीटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहेत. टी-20 मालिकेपेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची असल्याची आठवणही अनेकांनी बीसीसीआयला करून दिली. बीसीसीआयचा हा निर्णय म्हणजे कसोटी संघातील रोहितच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचे मत व्यक्त करत अनेकांनी बीसीसीआयवर सडकून टीका केली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम ट्‌वेंटी-20 मालिका खेळणार आहे. त्यातच भारतीय संघाची विंडीज विरुद्धची मालिका नुकतीच संपली आहे. त्यामुळे रोहितला पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता हा निर्णय घेतला असून आम्ही वैद्यकीय टीमशी सल्लामसलत केल्यानंतर रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्यावरील वाढलेला कामाचा ताण लक्षात घेता त्याला न्यूझीलंड संघाविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हा निर्णय संघ व्यवस्थापक आणि निवड समिती सदस्यांनी मिळून घेतला आहे.
– बीसीसीआय 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)