रोहित शर्माच्या क्षमतेवर विश्वास : सौरव गांगुली

कोहलीची अनुपस्थिती जाणवणार

नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती निश्‍चितच जाणवेल. मात्र रोहित शर्माच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. तो संघाचे कौशल्यपूर्ण पद्धतीने नेतृत्व करू शकेल. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी क्रिकेटरसिकांची पहिली पसंती ही भारतीय संघालाच असेल आणि भारतीय संघ विजेतेपद आपल्याकडेच राखेल याची मला खात्री आहे, असे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अधिक सरस असतो, ही गोष्ट खरी असली तरीही कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरीही उत्तम आहे. त्यामुळे तो या स्पर्धेत कर्णधार आणि खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षादेखील गांगुलीने व्यक्‍त केली. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 1-4 अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर भारतीय संघावर प्रचंड टीका झाली. इतकेच नव्हे तर भारतीय संघ, निवड समिती आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. पण असे असले तरी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघालाच पसंती असेल, असेही सौरव गांगुली याने म्हटले आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी हॉंगकॉंग संघाविरुद्ध होणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. भारतीय संघाने 2016 मध्ये आशिया चषकावर नाव कोरले होते. भारताने आतापर्यंत सहा वेळा आशिया चषक जिंकला आहे. यामध्ये पाच वेळा एकदिवसीय आणि एकदा टी-20 फॉर्मेंट होता. यंदाच्या स्पर्धेत नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)