रोहित पक्ष्यांचे जुन्नर तालुक्‍यात आगमन

  • पिंपळगाव जोगे जलाशय व खिरेश्वर येथे पर्यटकांची गर्दी

ओतूर – जुन्नर तालुक्‍यातील पिंपळगाव जोगे धरणाच्या जलाशय परिसरात व खिरेश्वर विभागात सोमवारी (दि.2) सायंकाळी आगमन झाले. माळशेजमधील सुरू झालेले धबधबे, वर्षाविहार करणाऱ्यांना पर्यटकांसाठी रोहित पक्ष्यांचे दर्शन ही एक पर्वणीच मिळाली आहे.
या पक्ष्यांमध्ये खूप शिस्तबद्धता दिसते. दिसायला शहामृगासारखा पांढरा रंग, पिवळी चोच असते. आकाशात झेप घेतो तेव्हा यांच्या पंखाचा आतील केशरी आणि काळा रंग सुंदर दिसतो. याला अग्निपंख असेही पंखाच्या आतील रंगावरून म्हणतात.
हे पक्षी समुहानेच येतात. एका समुहात400 ते 500 पक्षी असू शकतात. सर्वात पुढे एक पक्षी असतो, तो जितक्‍या उंचीवर झेपावतो तेवढ्याच उंचीवर इतरही झेपावतात. तो जसे करील त्याचे अनुकरण इतर पक्षी करतात. पाण्यात शिस्तबद्धरीतीने उभे राहातात किंवा आकाशात झेपावतात, तेव्हाचे त्यांचे दृश्‍य विलोभनीय असते.

पिंपळगाव जोगा धरण परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. फ्लेमिंगो या भागात रोहित पक्षी दरवर्षीच आफ्रिका, न्यझीलंड, तसेच आपल्याकडील उज्जैन, ठाणे, वसई खाडी अभयारण्यातूनही येतात. जलाशयाच्या कडेला कमी पाण्यात यांना खेकडे, मासे हे खाद्य भरपूर प्रमाणात मिळत असल्याने हे पक्षी या परिसरात येत असतात..
बापू वेळे, वनक्षेत्रपाल, ओतूर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here