दुबई येथे १५ सप्टेंबरपासून आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नसून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितचा मागील एकदिवसीय मालिकांमधील फॉर्म खूप चांगला राहिला आहे.

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार असलेला रोहित शर्मा आशिया चषक जिंकून आपले नाव इतिहासात नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. त्याने यासाठी कसून सराव देखील चालू केला आहे. या सरावाचा त्याने एक व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केला.

या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी खूप पसंद केले. परंतु, भारतीय संघातील गोलंदाज युजुवेंद्र चहल याला या व्हिडिओ बहुतेक आवडला नाही. त्याने या व्हिडिओला मिश्कीलपणे कॉमेंट केली, “डिफेन्स नाही बॉल उड़ाओ!”

रोहित शर्मा क्रिकेटविश्वात आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जाते. त्याने  एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके झळकावली असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. एका सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक २६९  धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)