रोहित्र जळाल्याने लांडेवाडी रस्ता 15 दिवसांपासून अंधारात

Electricity

सोनई- नेवासा तालुक्‍यातील सोनई येथे गेल्या 15 दिवसांपासून वीज रोहित्र जळाले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण विभाग मात्र काही दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिक या प्रकरणी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

सोनई हे नेवासा तालुक्‍यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथे नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असतो. मोठमोठे उद्योगधंदे असल्याने विजेअभावी येथे होणारे आर्थिक नुकसानही तितकेच मोठे असते. व्यापारी, शेतकरी वर्गाला या निमित्ताने झळ बसत आहे. सोनई परिसरातील लांडेवाडी रस्ता या भागात गेली 15 दिवसांपासून डीपी जळाली, पण महावितरणचे अधिकारी, वीजतंत्री याकडे लक्ष देत नाहीत. या प्रकरणी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून फक्‍त “करू आणि बघू’ असे उत्तरे देण्यात येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री-अपरात्री शेतकरी वर्गाला पाणी भरण्यासाठी उठावे लागते. तरी दिवसा आणि रात्रीही वीज नसल्याने मोठी तारांबळ उडाली आहे. सोनई गावात जुन्या तारांचा प्रश्न मोठा असून, महावितरणचे वायरमन मात्र लक्ष देत नसल्याने कधीही वीज जात असल्याने गावातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणी लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असे नागरिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)