रोहिंग्य मुस्लिमांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी संयुक्तराष्ट्रांचे पथक रवाना

संयुक्तराष्ट्रे – म्यानमार मधून हाकलवून लावण्यात आलेल्या सुमारे, सात लाख रोहिंग्य मुस्लिमांची बांगलादेशातील नेमकी स्थिती अभ्यासण्यासाठी तसेच म्यानमारधील स्थितीचाही अभ्यास करण्यासाठी संयुक्‍तराष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे पथक तिकडे रवाना झाले आहे. म्यानमार मधून हाकलवून लावण्यात आलेले हे मुस्लिम सध्या बांगलादेशात वास्तव्याला आहेत.

या नागरीकांवर अमानवी पद्धतीने अत्याचार करण्यात आले असून त्यांच्या बाबतीतील स्थितीची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेण्यासाठी हे पथक तिकडे गेले असल्याची माहित ब्रिटनचे संयुक्तराष्ट्रांतील राजदूत करेन पीयर्स यांनी दिली. म्यानमार सरकार या मुस्लिमांना आपले नागरीकच मानत नाही. ते म्यानमारचे स्थानिक रहिवासी नाहीत तर ते बांगला देशातून बेकायदेशीरपणे आलेले घुसखोर आहेत असे म्यानमार सरकारचे म्हणणे आहे. म्यानमार हा बौद्ध बहुसंख्याकांचा देश आहे. तेथे मुस्लिमांकडून धर्मांतरासारखे प्रकार घडत असल्याने बौद्ध नागरीकांनी लष्कराच्या मदतीने त्यांना तेथून हाकलवून लावले आहे. म्यानमार मध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये दंगली उसळल्यांतर मुस्लिमांनी थेट म्यानमारच्या लष्करावरच हल्ले चढवल्याने लष्करही त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते.

आज हा प्रश्‍न निर्माण होऊन इतके महिने झाले तरी या मुस्लिमांना परत स्वीकारण्यास म्यानमार सरकार तयार नसल्याने आणि भीतीपोटी हे नागरीकही तेथ जाण्यास उत्सुक नसल्याने पेच निर्माण झाला आहे. या साऱ्या स्थितीची माहिती संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे पथक घेणार आहे. या पथकातील सदस्य शनिवारी बांगला देशातील कॉक्‍स बझार जिल्ह्यला भेट देणार आहेत. तेथे या निर्वासितांनी सध्या आश्रय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)