रोहिंग्य मुस्लिमांच्या विरोधात निदर्शने

जम्मू  – जम्मू काश्‍मीर सह देशाच्या विविध भागात घुसलेल्या रोहिंग्य मुस्लिमांची तसेच बांगलादेशी घुसखोरांची सरकारने त्वरीत हकालपट्टी करावी या मागणीसाठी जम्मू काश्‍मीर नॅशनल पॅंथर्स पार्टीने आज विविध भागात जोरदार निदर्शने केली. या वेळी निदर्शकांनी सरकारच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या. या घुसखोरांना हाकलण्यासाठी सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला.या घुसखोरांमुळे येथील संस्कृतीला आणि सामाजिक सलोख्याला मोठा धोका निर्माण झाला आहे असा आरोप या संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.

या पक्षाच्या नेत्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यातील पीडीपी-भाजप सरकार या विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे त्यांना या प्रकरणातील गांभीर्यच लक्षात आलेले नाही. भाजपकडून काश्‍मीरातील फुटीरवादी नेत्यांना गोंजारण्याचे काम सुरू असून त्यामुळे, जम्मू भागातील लोकांवर अन्याय केला जात आहे असा आरोपही या संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)