रोहिंग्य मुस्लिमांची 70 कुटुंबे प.बंगालच्या आश्रयाला

नवी दिल्ली – रोहिंग्य मुस्लिमांची 70 कुटुंबे पश्‍चिम बंगालमध्ये आश्रयाला असून तेथील सरकारने त्यांच्यासाठी विशेष छावणी उभारली आहे. हे राज्य किंचीत रोहिंग्य फ्रेंडली असल्याचे आढळून आले आहे अशी टिप्पणी सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के के शर्मा यांनी केली आहे. तेथील रोहिंग्यांची चौकशी करण्यात आली असता ते तेथील सरकारच्या छावण्यांमध्ये राहात असल्याचे आढळून आले आहे असे ते म्हणाले.

बांगलादेशात मोठ्या प्रमाणात रोहिंग्य मुस्लिम आले असून तेथून ते गटागटाने भारतात येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळे त्यांची भारतात मोठ्या प्रमाणावर अद्याप तरी घुसखोरी होऊ शकलेली नाही असे त्यांनी सांगितले.

जे काही रोंहिंग्य भारतात घुसण्यात यशस्वी झाले आहेत त्यांच्यावरही स्थानिक पातळीवरून मोठा दबाव येत असल्याने ते पश्‍चिम बंगाल मध्ये आश्रयाला जात आहेत. तेथील सरकार त्यांच्या बाबतीत किंचीत सहानभुती दाखवत असल्याचे लक्षात असल्याने ते तिकडे जात असावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. रोहिंग्यांना सीमा भागाकडे जाण्यापासून आम्ही रोखत आहोत अशी माहिती बांगलादेश बॉर्डर गार्डसचे महासंचालक मेजर जनरल इस्लाम यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)