रोहिंग्या स्थायिक झाल्यास आणखी 10 काश्‍मीर – बाबा रामदेव

नवी दिल्ली – रोहिंग्या मोठ्या संख्येने जम्मू-काश्‍मीरमध्ये आश्रित म्हणून आले आहेत. तीन ते चार कोटी लोक भारतात अवैधरित्या राहतात. त्यात रोहिंग्याचीही भर पडली आहे. रोहिंग्या या देशात स्थायिक झाले तर भारतात आणखी दहा काश्‍मीर तयार होतील, असे परखड मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले.

आसाममधील एनआरसीचा मुद्दा आणि त्यानंतर रोहिंग्यांविषयी संसदेत झालेल्या चर्चेनंतर या मुद्वांवर योगगुरू बाबा रामदेव यांनीही आवाज उठवला आहे. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देत देशात घुसखोरी करणाऱ्या बेकायदा निर्वासितांवर नियंत्रण आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी देशात चार कोटी बेकायदा निर्वासित वास्तव्य करत असल्याचा दावा केला.

-Ads-

बाबा रामदेव म्हणाले, बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात. मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक काश्‍मीर हाताळणे कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते काश्‍मीरसारख्या अजून 10 समस्या उभ्या करतील.

यावेळी बाबा रामदेव यांनी आरक्षणावरही भाष्य केले. भारतात कायदा करण्याची गरज आहे. ज्यानुसार मागासवर्गातही आरक्षण कोणाला मिळावे, हे स्पष्ट होईल. ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांचा त्यात समावेश केला जाऊ नये. मात्र समाजातील एका विशिष्ट भागाला अद्यापही आरक्षणाची गरज आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)