रोहिंग्यावरील संयुक्तराष्ट्रांचा अहवाल म्यानमारने फेटाळला

प्रातिनिधिक छायाचित्र

यंगोन – रोहिंग्य मुस्लिमांचा वंशच्छेद करण्याचा प्रयत्न म्यानमारच्या लष्कराने केला असल्याचा दावा संयुक्तराष्ट्रांच्या एका अहवालात करण्यात आला आहे. तथापी हा अहवाल आणि त्यातील आरोप म्यानमारने फेटाळले आहेत. लष्कराने मुस्लिमांवर केलेल्या अमानुष अत्याचारामुळेच सात लाख रोहिंग्य मुस्लिमांना आपले वास्तव्याचे ठिकाण सोडून बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला आहे. या विषयीची माहिती प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेण्यासाठी संयुक्तराष्ट्रांची एक सत्यशोधन समिती तिकडे पाठवण्यात आली होती.

या समितीने म्हटले आहे की रोहिंग्यावर लष्करी कारवाई अत्यंत क्रुरपणे करण्यात आली. त्यांचा वंशच्छेद करण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून झाला आहे. म्यानमारच्या लष्करी नेत्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची मागणी संयुक्तराष्ट्रांत अनेक देशांनी केली आहे. म्यानमार सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितले की आम्ही संयुक्तराष्ट्रांच्या सत्यशोधन समितीला आमच्या देशात येऊन चौकशी करण्याची अनुमती दिलेली नव्हती. त्यामुळे आम्ही या विषयावरील कोणताही ठराव किंवा सुचना स्वीकारणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्हाला हा अहवालाच मुळात मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. स्वत: म्यानमार सरकारने या विषयाची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन केला होता त्या आयोगाने संयुक्तराष्ट्रं संघाच्या मानवाधिकार आयोगाने केलेला अहवाल चुकीचा ठरवला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)