रोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू 

बांगलादेश सरकारचा दावा

कोक्‍सबझार – म्यानमार मधून हुसकाऊन लावण्यात आलेल्या सुमारे सात लाख रोहिंग्य मुस्लिमांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया बांगलादेशाने सुरू केली आहे अशी माहिती या देशाच्या काही सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. 2200 पेक्षा अधिक मुस्लिमांना येत्या गुरूवारी कोक्‍सबझार जवळील गुंद्रम बॉर्डर पर्यंत नेऊन सोडण्यात येईल अशी माहिती बांगलादेशचे बेकायदा स्थलांतर विषयक विभागाचे आयुक्त अब्दुल कलाम यांनी दिली.

या प्रक्रियेवर संयुक्तराष्ट्रांची निर्वासित एजन्सी देखरेख ठेवणार आहे. संयुक्तराष्ट्रांच्या पुढाकारानेच बांगलादेश आणि म्यानमार मध्ये हे निर्वासित परत पाठवण्याचा करार झाला आहे. तथापि ही निर्वासितांना परत पाठवण्याची प्रक्रिया स्वेच्छेची आहे त्यासाठी कोणावरही बळजबरी केली जाणार नाही असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

-Ads-

पहिल्या टप्प्यात उद्या 30 निर्वासित कुटुंबाना त्यांच्या मूळ स्थानी परत पाठवण्यात येणार आहे.रोहिंग्य निर्वासितांचा प्रश्‍न अत्यंत बेफिकीरीने हाताळल्याबद्दल म्यानमार च्या नेत्या आँग सान स्यु की यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात टीका केली गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर ही प्रक्रिया सुरू होण्याला महत्व दिले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)