रोहिंग्यांच्या विरोधामुळे त्यांना मायदेशी धाडण्याची प्रक्रिया पुढे ढकलली 

कोक्‍सबझार – बांगलादेश सरकारने रोहिंग्य मुस्लिमांना मायदेशी म्हणजेच म्यानमार मध्ये धाडून देण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर रोहिंग्याच्या छावणीत मोठाच असंतोष पसरला होता. त्यांनी केलेल्या विरोधानंतर ही प्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय बांगला सरकारने घेतल्यानंतर तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे.

त्या भागात असलेल्या एका मशिदीतील इमामाने रोहिंग्य मुस्लिमांना या मायदेशी स्थलांतरीत करण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की म्यानमार सरकारकडून आम्हाला आमच्या सुरक्षेची हमी मिळाल्याशिवाय आम्ही तेथे परत जाणार नाही. तशी हमी मिळाल्याशिवाय कोणीही मायदेशी परत जाऊ नये असे आवाहन त्यांनी केल्यानंतर सर्व उपस्थितांनी तोच निर्धार व्यक्त केला.

-Ads-

बांगलादेशाने संयुक्तराष्ट्रांशी चर्चा करून आणि म्यानमार सरकारशी बोलून निर्वासितांना परत पाठवण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू करण्याचे ठरवले होते. त्याचा एक भाग म्हणून दीडशे निर्वासितांना लष्करी संरक्षणात म्यानमार सीमेपर्यंत नेण्यात आले होते. पण तेथून हे निर्वासित निसटले आणि ते पुन्हा आपल्या बांगलादेशातील छावण्यांमध्ये परत आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)