रोहयोतील घोटाळा प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

पाथर्डी: तालुक्‍यातील बहुचर्चित एकनाथवाडी येथे 2010 ते 2013 या कालावधीत रोजगार हमीच्या कामातील घोटाळा प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या गुन्ह्यात एकनाथवाडीचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, ग्रामसेवक सचिन बाळकृष्ण काळे यांच्या विरोधात 61 लाख 65 हजार 385 रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात विजय कारभारी आहेर यांचे विरुद्ध बनावट मृत्यूचे दाखले तयार केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्‍यातील 2011 ते 2013 या कालावधीत एकनाथवाडी येथे रोहयो योजनेतंर्गत प्रत्यक्ष कामे न करता बनावट मजूर कामावर दाखवून कागद पत्रांच्या आधारे लाखो रुपयांची बिले काढण्यात आली होती. याबाबत बाबा सानप यांनी 2013 मध्ये तत्कालीन सरपंच तथा मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याच्यासह रोहयो कामाशी निगडीत शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. याबाबत बाबा सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये दोषी विरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान सानप यांच्या तक्रारीवरून विविध अधिकाऱ्यांमार्फत संबंधित रोहयो कामांची चौकशी केली असता एकनाथवाडी येथे रोहयोच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाची इन-कॅमेरा चौकशी करण्यात आली होती. यामध्ये आठ पैकी पाच रस्त्यांवर थोड्या फार प्रमाणत कामे करून इतर तीन रस्त्यांची कामे न करताच सुमारे 61 लाख 65 हजार रुपयांच्या रकमेचे बिले काढल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले होते.

यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधीकारी विश्‍वजीत माने यांच्या आदेशान्वये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी दोन स्वतंत्र फिर्यादी नोंदवल्या असून पहिल्या फिर्यादीत एकनाथवाडीचे तत्कालीन सरपंच देविदास खेडकर व तत्कालीन ग्रामसेवक सचिन बाळकृष्ण काळे यांनी संगनमताने 2010 ते 2012 मध्ये एकनाथवाडी येथे मयत व्यक्ती रोहयो कामावर मजूर म्हणून दाखवून त्यांचे नावे पोस्टात बनावट खाते उघडून तसेच पाच किलोमीटरपेक्षा दूरच्या मालेवाडी,मुंगुसवाडे, ढाकणवाडी, भारजवाडी, दुलेचांदगाव या गावच्या मजुरांनी एकनाथवाडी येथे कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून मजुरी काढली.

देविदास खेडकर, ग्रामसेवक सचिन काळे यांच्यावर ग्रामपंचायत अभिलेख सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असतानी त्यांनी रोहयो कामाचे अभिलेख व ग्रामपंचायत अभिलेख गहाळ करून त्याबदल्यात खोटे अभिलेख तयार करून 61,65,385 रुपयांचा अपहर केल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात एकनाथवाडी येथील रोहयो गैरप्रकारातील मजुरांच्या यादीत नावे असलेले मयत केशवनाथ खेडकर, पांडुरंग बाळू डोंगरे, यांच्या मृत्यू दिनांकात मृत्यू रजिस्टरमध्ये खाडाखोड करून बदल करून मयताचे दाखले दुबार देवून ते खरे आहेत असे भासवून शासनाची फसवणूक केली असल्याबत तत्कालीन ग्रामसेवक विजय कारभारी आहेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)