रोम चित्रपट महोत्सवात “व्हिडिओसिटा’तील दालनाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली  – व्हर्च्युअल रिलिटी, व्हिडिओ गेमिंग निमेशन यावर लक्ष केंद्रीत असणाऱ्या “व्हिडिओसिटा 2018′ या कार्यक्रमात तसेच रोम चित्रपट महोत्सव आणि एमआयए (आंतरराष्ट्रीय दृक श्राव्य बाजारपेठ) यामध्ये भारत भागीदार देश आहे. व्हिडिओसिटा 2018 मधल्या भारतीय दालनात भारतीय चित्रपटांचा वारसा, भारतात चित्रीकरणासाठीची सुलभता, भारतीय चित्रपटसृष्टीचे विविध पैलू तसेच भारत-इटली दरम्यान दृकश्राव्यसह निर्मिती आदी दर्शवण्यात आले.

भारतीय दालनाचे उद्‌घाटन करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अशोक कुमार परमार यांनी भारताचा चित्रपट विषयक वारसा तसेच जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती होणारा देश म्हणून भारताचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय सिनेमांची संपन्नता आणि विविधता दर्शवणारे “चलो जीते है’ “व्हिलेन रॉकस्टार’ “सिंजर’ लडाख चले रिक्‍शावाला, न्यूटन की कहानी आणि क्विन आदी चित्रपट यावेळी दाखवण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)