रोमियोगिरी करणाऱ्यांची नावे सांगा

पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे विद्यार्थींनींना आवाहन

लोणी काळभोर- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना छेडणाऱ्या रोडरोमीयों विरोधात मुलींनी स्वतः ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. दामिनी पथकाच्या माध्यमातून रोडरोमियोंवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे काम चालू आहे. रोमियोगिरी करणाऱ्यांची नावे व त्यांच्या वाहनांचे नंबर पोलिसांना दिल्यास, संबंधितांवर कारवाई करणे पोलिसांना सोपे जाते. वरीष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी कायमच पाठीशी उभे आहेत. संकट आल्यास विद्यार्थीनींनीही पोलिसांना आपल्या कुटुबांतील एक घटक समजून मदत मागावी, असे आवाहन लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केले.
लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या शंभरहुन अधिक विद्यार्थिनींनी महाराष्ट्र पोलिस रेझींग डे निमित्त गुरुवारी (दि. 10) लोणी काळभोर पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी पोलिस ठाण्यात विद्यार्थीनीशी संवाद साधताना पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी वरील आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतीकुमार पाटील म्हणाले की, पोलिस यंत्रणा जनतेच्या रक्षणासाठी 24 तास काम करीत असते. छेडछाड होत असल्यास, महिला असो किंवा विद्यार्थीनी सर्वानिच पोलिसांना आपला मित्र मानुन मदत मागावी. विद्यार्थीनी व महिलांनी फोनवरुन अथवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती बरोबर संवाद साधू नये. यातून गुन्हांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालकांनीही एका ठराविक मर्यादेप्रर्यंतच मुला-मुलींच्या फोन वापरण्यास परवानगी द्यावी.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले व सहकाऱ्यांनी विद्यार्थीनींना सीसीटीएनएस संगणक प्रणाली, वाहतुकीच्या नियमांचे पालन, सायबर गुन्ह्यांबाबत घ्यावयाची काळजी, घटनास्थळी पुरावे कसे गोळा करावेत, शस्त्र-दारुगोळा, श्वान पथक, बॉम्बशोधक-नाशक पथक, इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, सीसीटीएनएस कमांड कंट्रोलचे कार्य, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक (क्विक रिस्पॉन्स टीम) यांचे कार्य तसेच बिनतारी संदेश यंत्रणाबाबतची माहिती दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)