रोमहर्षक सामन्यात यु मुंबाचा निसटता विजय

प्रो कबड्डीमध्ये आज पटणा लेगच्या दुसर्या दिवशी पटणा पायरेट्स आणि यु मुंबा यांच्या सामना झाला. या रोमहर्षक सामन्यात शेवटी यु मुंबाने ४०-३९ असा विजय मिळवला. या सामन्यात यु मुंबासाठी रेडर सिद्धार्थ देसाई आणि कर्णधार फझल अत्राचली यांनी अनुक्रमे १४ आणि ६ गुण मिळवले तर पटणासाठी परदीप नरवाल याने १७ गुण मिळवले.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीला यु मुंबा २-० ने आघाडी घेतली होती. परंतु, पायरेट्सने तिसर्या मिनिटाला खेळ ४-४ असा बरोबरीत आणला. ११ मिनिटे झाली तेव्हा यु मुंबा संघाने सामन्यात १०-७ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पहिल्या सत्रातील ४ मिनिटांचा खेळ शिल्लक होता त्यावेळी दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. पहिले सत्र संपले तेव्हा दोन्ही संघ १४-१४ अश्या समान गुणसंख्येवर होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसर्या सत्राची सुरुवात पायरेट्ससाठी चांगली झाली. दुसर्या सत्राच्या पाचव्या मिनिटाला त्यांनी यू मुंबा संघाला ऑल आऊट केले आणि २५-१८ अशी आघाडी घेतली. परदीप नरवालच्या रेडींगच्या मिनिटाला पायरेट्सची आघाडी २९-२३ अशी होती. परंतु, त्यानंतर यु मुंबाच्या खेळाडूंनी विशेषतः रोहित बालियान , सिद्धार्थ देसाई आणि फझलने आपला खेळ उंचावला आणि सामन्यात पायरेट्सची आघाडी ३७ -३६ अशी केली.

सामना संपण्यास दोन मिनिटे कमी असताना दोन्ही संघ ३८-३८ असे बरोबरीत होते. नंतर रोहित बालियान आणि सिद्धार्थ देसाई यांनी गन मिळवत यु मुंबाला४०-३९ असा एका गुणाने विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)