रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत; उमेश यादवची खराब गोलंदाजी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला टी२० सामना भलताच रोमहर्षक ठरला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत मेजवान भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी देखील भेदक मारा करत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय सार्थ ठरवला. भारतातर्फे सलामीवीर के एल राहुल याच्या अर्धशतकाव्यतिरिक्त कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही.

भारतीय फलंदाजांचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर निभाव न लागल्याने तगड्या फलंदाजांचा भरणा असलेला भारतीय संघ केवळ १२६ धावांमध्ये गारद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांसाठी सामना सोपा बनविला मात्र धावफलकावर केवळ १२६ धावांचे आव्हान असताना देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांना विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. प्रत्येकी चेंडू गणिक या सामन्यातील चुरस आणखीनच वाढत असल्याने विशाखापट्टणमच्या क्रिकेट मैदानावर जमलेल्या क्रिकेट प्रेमींसाठी हा सामना पर्वणीच ठरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतातर्फे बुमराहने भेदक मारा करत ४ षटकांमध्ये केवळ १६ धावा देत ३ बळी टिपले. त्याने सामन्यामधील शेवटून दुसऱ्या षटकामध्ये २ बळी टिपत सामना भारताच्या बाजूने फिरवला मात्र शेवटच्या षटकात उमेश यादवने केलेल्या खराब गोलंदाजीमुळे भारताला हा सामना गमवावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)