रोबो अॅडव्हायजरी व मोफत सल्ल्यांचे मायाजाल (भाग-२)

प्रत्येकाची गुंतवणूक गरज ही वेगळी असते, पण तिचा विचार न करता रोबो अॅडव्हायजरी व मोफत सल्ल्यांचे पेव सध्या फुटले आहे, त्यापासून सुज्ञ गुंतवणूकदारांनी दूर राहायला हवे.

रोबो अॅडव्हायजरी व मोफत सल्ल्यांचे मायाजाल (भाग-१)

स्वास्थ आणि पैसा हे अत्यंत बहुमूल्य आहे. या दोघांमध्ये दीर्घकालीन सशक्त वाढ करण्यासाठी वैयक्तिक सल्लागार असणे व त्याचा सल्ला घेऊनच पुढील वाटचाल ठरवणे हे फायद्याचे ठरते. मोफत मिळते म्हणून केवळ काही छोटी रक्कम वाचवण्याच्या धडपडीत अयोग्य सल्ला अथवा पर्यायांचा वापर स्वास्थ तसेच पैशाच्या गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यातील परिणाम सुखकारक व अपेक्षित असे मिळणार नाहीत.

-Ads-

मुळातच गुंतवणुकदाराला स्वतःची आर्थिक जोखिम स्वीकारण्याची कितपत तयारी आहे याची जाणीव नसते. केवळ जास्तीचा आर्थिक परतावा हवा आहे यासाठी नकळत स्वतःवरील जोखिम गुंतवणूकदार वाढवत असतात. रोबो अॅडव्हायजरीमध्ये मानवीय स्पर्श नसल्याने गुंतवणुकदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे संगणक प्रणाली ठरवलेल्या सुत्रानुसार आर्थिक पर्याय देत असते. उदाहरणार्थ – एखाद्या गुंतवणूकदाराने गुंतवलेला पैसा कोणत्याही दिवशी गरज असल्यास काढता यावा अशा गुंतवणुकीच्या पर्यायात गुंतवण्याचे ठरले असताना प्रत्यक्षात त्याने निवडलेल्या पर्यायासाठी ही बाब उल्लेख न केल्यास चुकीचा पर्याय समोर येतो आणि अशावेळी गुंतवणूकदारासमोर मोठी अडचण निर्माण होते.

गुंतवणूक करताना योग्य तोच पर्याय निवडणे दिवसेंदिवस जटील होत आहे. अनेक नवनवीन पर्याय निर्माण होत असताना यातील नेमका पर्याय कसा आणि कधी निवडावा यासाठी प्रत्येकाने आर्थिक गरजा भविष्यातील उद्दीष्टे यांची योग्य सांगड घालत योग्य निर्णय करणे आवश्यक आहे. व्यक्तिगत आर्थिक सल्लागारासोबत मनमोकळेपणाने आपल्या आर्थिक गरजांची चर्चा केल्यास आपली जोखिम स्वीकारण्याची तयारी व आपल्याकडे असणारा गुंतवणुकीचा कालावधी याची योग्य सांगड घालत आर्थिक सल्लागार योग्य तेच पर्याय समोर देतात. यातून प्रत्येक गुंतवणूकदाराचे आर्थिक नियोजन सुयोग्य व अर्थपूर्ण होते.

मोफत सल्ला व मोबाईलमधील उपलब्ध तंत्रज्ञान याच्या मायाजालाचा प्रत्येक सूज्ञ गुंतवणूकदाराने निश्चितपणे विचार करायला हवा. काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवायला हवे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)