रोबोट सोफियाने व्यक्त केली ‘ही’ अनोखी इच्छा

काठमांडू (नेपाळ) : मानवासारखी हुबेहूब दिसणारी आणि सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेली रोबोट सोफिया हिला जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करायचे आहे. काठमांडू येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात सोफियाने ही ईच्छा व्यक्त केली. मात्र एव्हरेस्ट कधी सर करणार, या प्रश्नाला मात्र सोफियाने उत्तर दिले नाही.

रोबोट सोफियाने सांगितले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मानवाने भविष्यात पृथ्वीला सुरक्षित बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

नेपाळमधील गरीब नागरिकांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत, असेही तिने सांगितले. सोफियाच्या म्हणण्यानुसार मशीन आणि रोबोट मानवी जीवन सोपे बनविण्यासाठी आहेत. इंटरनेटच्या मदतीने आपण देशातील दुर्गम भागापर्यंत सहज पोहोचू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)