रोनाल्डोची नेत्रदीपक वाटचाल…

File photo

सध्या 33 वर्षे वयाचा असलेल्या रोनाल्डोची तंदुरुस्ती अद्वितीय अशीच आहे. स्पेनविरुद्ध 2004 युरो चषक स्पर्धेत पोर्तुगालला विजय मिळवून देणाऱ्या 19 वर्षीय खेळाडू आता जगातील आघाडीचा खेळाडू बनला आहे. त्याच्या नावावर 81 आंतरराष्ट्रीय गोलची नोंद आहे. त्याने बलून डी’ऑर हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला देण्यात येणारा पुरस्कारही पटकावला असून यंदाच्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील तो सर्वाधिख लक्षवेधी खेळाडू आहे. तरीही 2022 विश्‍वचषक स्पर्धेत रोनाल्डो खेळणार किंवा नाही, याबद्दल काहीही सांगणे अवघड आहे.

त्यामुळेच अल्जीरियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या मित्रत्वाच्या लढतीत पोर्तुगालकडून 150वा सामना खेळलेल्या रोनाल्डोसाठी या वेळची फिफा विश्‍वचषक स्पर्धा निर्णायक ठरणार आहे. त्याच्यासाठी विश्‍वचषक पटकावण्याची ही अखेरचीच संधी आहे. मात्र विश्‍वचषक स्पर्धांमधील रोनाल्डोची कामगिरी निराशाजनक आहे. त्याने 2006 स्पर्धेत इराणविरुद्ध, 2010 स्पर्धेत कोरियाविरुद्ध आणि 2014 स्पर्धेत घानाविरुद्ध असे केवळ 3 गोल नोंदविले आहेत. परंतु कारकिर्दीतील अखेरच्या विश्‍वचषक स्पर्धेत खेळताना ही कामगिरी मागे टाकून काहीतरी संस्मरणीय कामगिरी करण्यासाठी रोनाल्डो उत्सुक आहे. संघाची उत्तम बांधणी करून सहकाऱ्यांकडून चांगली कामगिरी करून घेण्याची त्याची हातोटी आता पमाला लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)