रोनाल्डोचा आणखी एक विक्रम!

file photo

माद्रिद: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सुरेख पासवर मॅन्झुकिचने केलेल्या गोलच्या जोरावर यूवेंट्‌स संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या “एच’ गटात वेलेंसिया संघाला 1-0ने नमविले. यासह यूवेंट्‌सने स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. हा सामना रोनाल्डोसाठी ऐतिहासिक ठरला. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासात रोनाल्डोने या विजयासह आपल्या शंभराव्या विजयाची नोंद केली. असा पराक्रम करणारा रोनाल्डोहा जगातील पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे.

ऑक्‍टोबर 2003 मध्ये मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळताना रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्ये पदार्पण केले होते. स्टुट्‌गार्टविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र, आपल्या दुसऱ्या सामन्यात रेंजर्स क्‍लबला पराभूत करून रोनाल्डोने पहिल्या विजयाची चव चाखली होती. तसेच, चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक 121 गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)