रोड रोमियोला सांगवीत बेड्या

पिंपरी – महाविद्यालयात ये-जा करताना विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

सोन्या उर्फ विक्रांत वसंत जगताप (वय-24, रा. राजाराम नगर, नवी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप हा सतत दुचाकीवरुन येवून एका विद्यार्थिनीची छेड काढत होता, तिच्यावर शेरे बाजी करत होता. गेली सहा महिने हा प्रकार सुरु होता. अखेर या विद्यार्थिनीने पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार पोलिसांनी जगताप याला अटक केली. मुलींसाठी पोलीस खाते “बडी कॉप’, “फोन अ फ्रेंड’ अशा अनेक उपक्रम राबवत आहेत. मुलींनी त्याचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)