रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू 

file photo

नितीन गडकरी  : “रस्ते सुरक्षा’ विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज 

नागपूर – देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. हे रस्ते “डीपीआर’ (डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट) नुसार केले जात आहेत. मात्र, हे डीपीआर अभियंते घरी बसून तयार करत असल्याने यात प्रचंड चुका असतात, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कानउघाडणी करत रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू होत असल्याचे वक्‍तव्य केले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड कॉंग्रेसच्या 79व्या अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलग्नित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

नितीन गडकरी म्हणाले, रोड इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असतात. वळण बरोबर न घेणे, झाडांच्या फांद्या वाहतुकीच्या आड येणे यासारखे अनेक दोष यात आढळून येतात. रस्ते सुरक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. रस्ते अपघातामुळे 3 लाख लोक दिव्यांग झाल्याचे वास्तव आहे. अपघातात सापडलेल्या 50 टक्के लोकांचे जीव वाचविण्यात आपल्याला अपयश येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

भारतातील भयावह वास्तव 
एक वळण चुकले म्हणून 150 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना या देशात घडली. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. 5 लाख अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 18 ते 35 वयोगटातील युवकांची संख्या 65 टक्के आहे. भारतातील या भयावह वास्तवामुळे आमची मान खाली जात असल्याचे गडकरी म्हणाले. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)