रोडेमळ्यात सटवाजी बाबा मंदिरात हरिनाम सप्ताह

संग्रहित छायाचित्र

लाखणगाव -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथील रोडेमळ्यात सटवाजी बाबा मंदिरात रविवार (दि. 25) पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात झाली आहे. येत्या रविवारी (दि. 1) मल्हारीमहाराज शेवाळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती समस्त सटवाजी बाबा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
अखंड हरिनाम सप्त्ताहात सचिनमहाराज रोडे, शिवाजीमहाराज जाधव, डॉ. गंगाराममहाराज पडवळ, श्रीराममहाराज वाळूंज यांची प्रवचने झाली आहेत. तर मधुकरमहाराज गायकवाड आदर्श ग्राम गावडेवाडी, भगवानमहाराज जारकड, हनुमानमहाराज गंगथडे यांची प्रवचने होणार आहेत. तसेच या सप्ताहात जयसिंगमहाराज माळवदकर, माऊलीमहाराज पिंगळे, संतोषमहाराज बढेकर यांची वारकरी श्रीहरी किर्तने झाली आहेत. तर जालिंधरमहाराज करंडे (काठापूर), विष्णूमहाराज केंद्रे, रामदासमहाराज रोडे (गुळाणी), तर हनुमान महाराज गंगथडे यांचे हनुमान जन्माचे किर्तन होणार आहे. या सप्ताहाची सांगता मल्हारीमहाराज शेवाळे (सविंदणे) यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. या श्रवण सुखाचा लाभ पंचकोशीतील भावीकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजक सटवाजीबाबा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)