रोडीज फेम रघु रामने जाहीर केला हटके घटस्फोट

मुंबई : एमटीव्हीच्या रोडीजमध्ये जज म्हणून दिसणाऱ्या रघु राम आणि त्याची पत्नी सुगंधा गर्फ  यांचा घटस्फोट झाला आहे. रघु रामने पत्नी सुगंधासोबत आपला घटस्फोट झाल्याचे इन्स्टाग्रामवर जाहीर केले आहे. पण त्याचा हे जाहीर करण्याचा अंदाज मात्र हटके आहे.
२९ जानेवारी कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळं झालेल्या या जोडप्याने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये फोटोसोबत रघुने लिहिले, ‘काही गोष्टी कधीही बदलत नाही… जसं तुझ्यासाठी माझं प्रेम, जसं आपण एकमेकांसोबत करत असलेली मस्ती. काहीही संपणार नाही. हे केवळ बदलेल आणि एक नवा अध्याय सुरू होईल’ यासोबत रघुनं #FriendshipGoals #DivorceGoals हे हॅशटॅग वापरले. रघु रोडीजसोबत काही शॉर्ट फिल्म्स आणि सिनेमांतही दिसलाय. सध्या तो टीव्ही कार्यक्रम ‘एन्टरटेन्मेंट की रात’मध्येही दिसतोय. तर सुगंधा गर्फ यापूर्वी ‘जाने तू या जाने ना’ या सिनेामात दिसली. रघु आणि सुगंधानं २००६ मध्ये लग्न केलं होतं. २०१६ साली या जोडप्यानं एकमेकांपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)