रोडरोमिओंना आळा घाला

रेडा- इंदापूर शहरासह ग्रामीण भागांमध्ये विविध ठिकाणी रोडरोमिओंच्या टोळक्‍याकडून होणाऱ्या छेडछाडीमुळे अनेक विद्यार्थिनी शाळा व महाविद्यालयामध्ये जाण्यास घाबरत आहेत. तरी या रोडरोमिओंच्या उच्छादनाला आळा घालावा, अशी मागणी इंदापूर तालुका युवा सेनेच्या वतीने पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवासेना उपजिल्हा युवाधिकारी सुदर्शन रणवरे, सरचिटणीस सुरज सानप, संदिप चौधरी, आकाश डांगे, संजय खंडागळे, मोहसीन पटेल यांच्यासह युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा, महाविद्यालय, बस स्थानक व सार्वजनिक ठिकाणांवरील रोडरोमिओंचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा.पोलीस प्रशासनाने दामिनी पथक स्थापन करून पथक व पोलीस हेल्पलाईनचे संपर्क क्रमांक शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर लावावे. शाळा, महाविद्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्यावेळी या पथकांनी तिथेच उभे रहावे. पथकांनी फक्‍त फेरी न मारता विद्यार्थिनी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याशी वारंवार संवाद साधून त्यांना बळ द्यावे. इंदापूर शहरातील प्रमुख चौकातील कॅमेरे व सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस ठाण्याशी जोडण्यात यावी. व ग्रामीण भागातील बस स्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशा नऊ ते दहा मागण्यांचे निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)