दौंड- पोलिसाला मारहाण करणाऱ्या रोडरोमीओच्या वडिलांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. शुक्रवारी (दि.24) बिट मार्शलवर असणाऱ्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या रोडरोमिओचे वडील अजय अण्णाराव जाधव याला शनिवारी (दि.25) दौंड न्यायालयात हजर केले होते. त्यावर त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबलला आरोपींच्या पोलीस नातेवाईकाने पोलीस स्थानकाच्या गेट समोरच “तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली. याची अद्यापपर्यंत कोणतीही नोंद पोलिसांत झाली नसली तरीही शहरात याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. त्यामुळे पोलीसच पोलिसांचे दुश्‍मन झाले आहेत, अशी चर्चा सुरु होती. या प्रकरणात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पोलिसांवर अशा प्रकारे दादागिरी करणाऱ्यांचा आणि त्याला खतपाणी घालणाऱ्यांचा बंदोबस्त पोलीस अधीक्षक करतील काय?असाही प्रश्न विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)