रोडरोमिओंची गय नाही

शिक्रापूर- येथील परिसरामध्ये महाविद्यालय परिसरातील रोडरोमिओंची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, मुलींना त्रास देणाऱ्या, दुचाकीवर गिरक्‍या मारणाऱ्या मुलांची तसेच रोडरोमिओंची गय केली जाणार नाही. शाळा व महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिला.
बारामती येथे महाविद्यालयीन युवतीने केलेल्या आत्महत्त्येमुळे सर्वत्र पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला असून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील शाळांना भेटी तसेच मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले आहे. यावेळी निरीक्षक शेलार बोलत होते. ावेळी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, महिला पोलीस नंदा मोहिते घोडके यांनी मुला-मुलींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत माने, सोमनाथ दिवटे, शिवशांत खोसे, सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या सुजाता खैरे, विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे, उपप्राचार्य रामदास शिंदे, पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, पोलीस नाईक ब्रम्हानंद पोवार, संदीप जगदाळे, संजय ढमाले, महिला पोलीस नंदा मोहिते-घोडके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष शेरखान शेख, कार्याध्यक्ष जालिंदर आदक, पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष अंकुश घारे, अतुल थोरवे, सूर्यकांत शिर्के यांसह आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघ व पोलीस ठाण्याच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या मार्गदर्शन शिबिरात मोबाईल वापराचे फायदे व तोटे, वाहतुकीचे नियम यांविषयी पोलीस स्टेशनच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. मुलांनी मन लावून अभ्यास तसेच जिद्द ठेवून कठोर परिश्रम घेतल्यास तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवल्यास मुलांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते, असे मत पोलीस निरीक्षक शेलार यांनी व्यक्त केले. मुलींना मुलांपासून होणारा त्रास व अन्याय यावर तक्रार करण्यासाठी महिला पोलिसांच्या नावाचे व नंबरचे पोस्टर लावण्यात आले. यावेळी मुलींना त्रास होत असल्यास मुलींनी महिला पोलिसांना तक्रार करण्यासाठी महिला पोलिसांचे मोबाईल नंबर देण्यात आले.

  • अन्याय सहन करणार नाही
    पोलिसांनी केलेल्या मार्गदर्शन तसेच आम्हाला दाखविलेला आधार यामुळे आमची भीती गेलेली आहे. कोणत्याही प्रकारे आम्ही अन्याय सहन करणार नसल्याचे यावेळी विद्यालयातील मुलींनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.
  • मुलींनो तुम्ही फक्त मला फोन करा
    शिक्रापूर परिसरात असलेल्या विद्यालय परिसरात नुकतेच महिला पोलीस कर्मचारी नंदा मोहिते व सुवर्णा गायकवाड यांच्या मोबाईल नंबरचे पोस्टर लावण्यात आले आहे. मुलींनो तुम्हाला कोणी त्रास देत असल्यास तुम्ही फक्त मला फोन करा व माहिती द्या तुमचे नाव सुद्धा सांगू नका. काही तासांतच त्या त्रास देणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे महिला पोलीस नंदा मोहिते यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)