रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंना ट्रॅक सूट व टी-शर्ट

तळेगाव-दाभाडे : विद्यालयातील क्रीडा विभागाच्या खेळाडूंना टी-शर्ट व क्रीडा प्रशिक्षकांना ट्रॅक सूटचे वाटप करताना विलास काळोखे व अन्य मान्यवर.

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील ऍड. पु. वा. परांजपे विद्यालयातील क्रीडा विभागाच्या कबड्डी व खो-खो संघातील 50 विद्यार्थी खेळाडूंना टी-शर्ट व क्रीडा प्रशिक्षकांना ट्रॅक सूटचे रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांच्या वतीने मंगळवार दि. 29 रोजी वाटप करण्यात आले.

विलास काळोखे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचा ओढा हा मोबाईल व संगणक खेळाकडे अधिक आहे. मैदानी खेळातूनच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होवून भारताची तंदुरुस्त पिढी निर्माण होते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास महत्त्वाचा आहे. विद्यालयाला अत्याधुनिक क्रीडांगण, क्रीडा साहित्य व ई-लर्निंग संगणक उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंनी खिलाडू वृत्ती जोपासून यशाबरोबर अपयश पचवण्याची मानसिक तयारी ठेवावी. खेळाडूमधूनच देशाचे कार्यक्षम नेतृत्व निर्माण होते.

रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीचे उपाध्यक्ष नितीन शहा, संचालक संजय मेहता, बाळासाहेब रिकामे, रो. उपाध्यक्ष केशव मोहोळ-पाटील, राधाकृष्ण येणारे, धनंजय नांगरे, संजय वंजारे, विजय वरघडे, पल्लवी दुश्‍मन, वंदना मराठे, संगीता खराडे व विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.  शिक्षक भगवान शिंदे यांनी सूत्रसंचालन व शिक्षक राधाकृष्ण येणारे यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)