रोटरी क्‍लबच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराचे वितरण

लोणावळा,  (वार्ताहर) – समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा रोटरी क्‍लब आँफ लोणावळा यांच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्यंकटराव भताणे, लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस व रोटरी क्‍लबचे अध्यक्ष बापू पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी मन:शक्ती केंद्राचे संचालक प्रल्हाद वाफाळे, एकविरा प्रतिष्ठानचे संचालक निवृत्ती देशमुख, उत्तरा पर्यावरण शाळेचे प्रमुख निलमकुमार खैरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे खजिनदार नवनाथ देशमुख व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना बापू पाटील म्हणाले की, रोटरी क्‍लबच्या माध्यमातून समाजात काम करत असताना शिक्षण, समाजकार्य, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात काही मंडळी व्यक्तीगतरित्या, तर काही संस्थाच्या माध्यमातून आत्मियतेने काम करत असल्याचे निदर्शनास आले. अशा मंडळींचा कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा मानस मनाशी बाळगत रोटरी क्‍लबच्या वतीने यावर्षी प्रथमच नवीन उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत लोणावळा व ग्रामीण परिसरातील 35 जणांना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी बोलताना व्यंकटराव भताणे म्हणाले की, समाजात आपण नि:स्वार्थपणे व कसलीही अपेक्षा न धरता काम करत असताना रोटरी सारख्या संस्था आपल्या कामाची दखल घेत आहे, हे पुरस्कार्थीसाठी गौरवास्पद आहे. विनय विद्वांस यांनी सर्व पुरस्कार्थीचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन रवींद्र कुलकर्णी यांनी केले. वानखेडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)