रोटरीच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप

वाई :विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप्रसंगी रोटरीचे पदाधिकारी.

वाई, दि. 2 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पुस्तकांचे वाचन केल्यास स्पर्धा परीक्षांचा मार्ग सुकर होण्यास निश्‍चितच मदत मिळेल असे, प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी यांनी किसन वीर महाविध्यालयात रोटरी क्‍लबच्या वतीने वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप समारंभात बोलताना केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, रोटरीच्या माजी अध्यक्षा श्रीमती स्वाती हेळकर,रोटरीयन अरुण खरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.जयवंतराव चौधरी यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात कराच परंतु त्याबरोबर वाचन संस्कृती जोपासा असे आवाहन केले.
रोटरीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाची दहा लाख पुस्तके उपलब्ध करणार असून वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असआवाहन केले.यावेळी माजी अध्यक्षा श्रीमती स्वाती हेळकर , प्राचार्य डॉ.चंद्रशेखर येवले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा, राजेंद्र जाधव, सूत्रसंचालन प्रा.अर्जुन जाधव तर आभार प्रा.हरीश कारंडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)