रोझ व्हॅली पॉन्झी घोटाळा…

तब्बल 2 हजार 300 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
कोलकता – रोझ व्हॅली पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात मोठी कारवाई करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज तब्बल 2 हजार 300 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेत सुमारे दोन डझन हॉटेल आणि रिसॉर्टस्‌चा समावेश आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत ईडीने जप्तीची कारवाई केली. त्यानुसार पश्‍चिम बंगालमधील 11 रिसॉर्टस्‌, 9 हॉटेल, 200 एकर जमीन आणि इतर काही जागांवर टाच आणण्यात आली.

या घोटाळ्याबद्दल आतापर्यंत एकूण 4 हजार 200 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने याआधीच रोझ व्हॅली ग्रुप आणि ग्रुपचा अध्यक्ष गौतम कुंडू याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुंडूला 2015 मध्ये कोलकत्यात अटक करण्यात आली.

याप्रकरणी ईडीने कोलकता आणि भुवनेश्‍वरमधील न्यायालयांत अनेक आरोपपत्र दाखल केले. चिट फंड चालवण्यासाठी रोझ व्हॅली ग्रुपने 27 कंपन्या सुरू केल्या. मात्र, त्यातील काहीच कंपन्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले. ग्रुपने असंख्य गुंतवणूकदारांची मोठ्या परताव्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. रोझ व्हॅली ग्रुपने केलेला घोटाळा 15 हजार कोटी रूपयांचा असल्याचा अंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)