“रोझ व्हॅली’त ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

पिंपरी – पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटी अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण साडेआठशे लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.

या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. रोझ व्हॅली सोसायटीत एकूण 276 सदनिका आहेत. या सोसायटीत दररोज एकुण 1 टन ओला कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लॅंटमध्ये संकलित करण्यात येतो. सध्या सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. एकुण एक टन ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून येथे खत निर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लॅंट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडून करण्यात आला आहे. यासाठी सोसायटीचा प्रत्येक कोपरा आणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.

सोसायटी परिसर व उद्यानात पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. तीन महिन्यात संकलित कचऱ्याची पहिली खेप (बॅंच) निघणार आहे. सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.

खत निर्मिती प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा पराशर, सचिव रुपेश भंडारे, जयदेव दवे, विवेक महाजन, आनंद कुर्तडीकर, व्यंकट शंकर, श्वेताभ कुमार, निधी व सोसायटीमधील सभासद तसेच कुणाल आयकॉन सोसायटीचे अध्यक्ष विनोद सुर्वे, प्राईम प्लस सोसायटीचे अध्यक्ष पंकज भाकरे आदी उपस्थित होते.

कचऱ्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही. खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहून वाटते. प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी प्रयत्नशील आहोत.
– नाना काटे, नगरसेवक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)