रोजच्या खाण्यातल्या अन्नपदार्थांचा काही रोगांवर औषध म्हणून उपयोग

सफरचंद : यात लोह आणि क जीवनसत्व असते. मेंदू आणि चेतासंस्थेवर याचा चांगला उपयोग होतो

आवळा : यात सर्वात जास्त क जीवनसत्व असते. रोग प्रतिकारशक्‍ती वाढते

केळी : बद्धकोष्ठ आणि जुलाब या दोन्हीवर उपयोग होतो

कार्ले : यात क जीवनसत्व, लोह, कॉपर असते. मधुमेहावर उपयोग होतो

गाजर : यात अ जीवनसत्व असते. डोळे दात आणि हाडे यांच्या आरोग्यासाठी उपयोग होतो

दही : अन्नाचे पचन होते. डोळे आणि त्वचेसाठी गुणकारी

अंजीर : पोट साफ होते. यकृत विकारावर आणि दम्यावर गुणकारी

लसूण : रक्‍तदाब, सांधेवात, दमा, खोकला, सर्दीपडसं आणि गाऊट यावर गुणकारी

आले : अपचन आणि पोटातल्या गॅसेसवर गुणकारी

आल्याचा चहा : सर्दी-पडसं आणि खोकल्यावर गुणकारी

द्राक्षे आणि मनुका : यात लोह आणि कॉपर मॅगनीज आणि पोटॅशियम असते. पोट साफ होते.

मध : अशक्‍तपणा घालवते. खोकल्यावर गुणकारी

इसबगोल : पोट साफ होते. रक्‍तदाब कमी होतो. जुलाबावरही गुणकारी

लिंबू : यात क जीवनसत्व असते. ह्रदय आणि त्वचा विकारावर गुणकारी

लेट्युस : अस्वस्थपणा आणि ह्रदयाची धडधड कमी करते

लिंबाची पाने : त्वचा विकारावर आणि रक्‍तवाढीवर गुणकारी

कांदा : रक्‍तातले कोलेस्टेरॉल कमी करते

पपई : अपचन दूर करते. पोट साफ होते. यात क आणि अ जीवनसत्व व लोह असते.

डाळींब : रक्‍तस्थंभक. जुलाबावर गुणकारी

मुळा :किडनी स्टोन, कावीळ, आणि अल्पार्तव म्हणजे मासिक पाळीमध्ये अंगावर कमी जाणे यावर गुणकारी

लाल टोमॅटो: ऍनिमिया, रक्‍तशुध्दी करते. यात अ, ब गटातली जीवनसत्वे आणि क जीवनसत्व असते.

सोयाबीन : मधुमेह, दमा, खोकला यावर गुणकारी. यात भरपूर प्रथिनं असतात

पालक : बद्धकोष्ठ दूर करते. यात अ. ई जीवनसत्व, लोह आणि पोटॅशियम असते

त्रिफळा : म्हणजे हिरडा बेहडा आणि आवळ्याचे मिश्रण. बध्दकोष्ठ, गॅस दूर करते. भूक आणि स्मरणशक्‍ती वाढवते.

तुळशीचा काढा: ताप, सर्दी, खोकला आणि वेदना यावर गुणकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)