रोजगार हमी योजनेकडे दुष्काळग्रस्तांचा ओढा

File photo

पुणे – दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेकडे ग्रामीण भागातील नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. नोव्हेंबर महिना अखेरीस पुणे विभागात 1 हजार 876 कामे सुरू झाली असून, तब्बल 31 हजार 141 हाताला काम मिळाले आहे.

राज्य सरकरने दुष्काळसदृश स्थिती असलेले तसेच मध्यम आणि तीव्रतेच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त वाड्या आणि गावे जाहीर केली आहेत. त्यानुसार पुणे विभागातील 11 हजार 401 गावे आणि वाड्यांचा टंचाई आराखडाही विभागीय आयुक्तालयाने तयार केला आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगरी भाग वगळता बारामती आणि शिरुरसारख्या तालुक्‍यातही टंचाई आहे.

-Ads-

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर 417 कामे सुरू असून, त्यावर 1 हजार 767 मजूर काम करीत आहे. तर, इतर कामांची संख्या 82 असून, मजुरांची संख्या 588 आहे., अशी 499 कामे सुरू असून, मजुरांची संख्या 2 हजार 355 आहे.

विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 539 कामे सुरू असून, त्यावर तब्बल 17 हजार 417 मजूर काम करीत आहेत. त्यात ग्रामपंचायत स्तरावर 413 कामे सुरू असून, त्यावर 12 हजार 201 मजूर काम करीत आहेत. तर, इतर ठिकाणच्या 126 कामांवर 5 हजार 216 जणांना काम मिळाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)