रोजगार निर्मितीसाठी ७.५ टक्क्यांचा विकासदार अपुरा- रघुराम राजन

नवी दिल्ली : देशात रोजगार निर्मितीसाठी ७.५ टक्क्यांची विकासदार अपुरा असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. भारताने पुढील १० ते २० वर्षांचा विचार केला पाहिजे. अधिक रोजगार निर्मितीसाठी अधिक जोर लावावा लागेल. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांना वेग दिल्यास भारत लवकरच १० टक्क्यांचा विकासदर गाठू शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला. शिकागो विद्यापीठातील बूथ ऑफ बिझनेस स्कूलचे प्रोफेसर राजन हे हाँगकाँगमध्ये आयोजित एका परिषदेत बोलत होते.

भारतात पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. कंपन्यांसाठी मार्ग तयार केला जात आहे. व्यवसाय सुलभ बनवणे तसेच आरोग्य आणि शिक्षणाबरोबरच मनुष्यबळाच्या गुणवत्तेत सुधारणा केल्यास १० टक्के विकासदर भारताला गाठता येईल. यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

जर आम्ही हे करू शकलो तर मला वाटते की आम्ही निश्चितपणे ७.५ टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ. कारण प्रत्येकवर्षी १.२ कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी हा विकासदर पुरेसा नाही. आम्ही दहापेक्षाही पुढे जाऊ शकतो. आम्ही असं करू शकतो, पण आम्हाला यावर काम करावे लागेल असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)