रोजगार निर्मितीसाठी “रिपाइं’ची पूरक भूमिका!

पिंपरी- रिपाइंच्या उद्योग सेलच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मराठवाड्यात रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने राज्याचा दौरा पूर्ण झाला असून, उपलब्ध आकडेवारीनुसार रोजगारनिर्मितीसाठी आम्ही कटीबद्ध असून , उद्योग सेल पूरक भूकिा बजावत आहे, असे मत रिपाइंचे उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांनी व्यक्त केले.

रिपाइं उद्योग सेलच्या वतीने चिंचवड येथे रविवारी (दि.13) राज्यस्तरिय मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सेलचे राज्य सरचिटणीस ख्वाजाभाई शेख, पिंपर-चिंचवड शहराध्यक्ष भारत बनसोडे, जालना जिल्हाध्यक्ष आकाश पांजगे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश जाधव, विजय साळवी, संदीप नांदेडकर, बबलू यादव व राज्यभरातील पदाधिकारीॅ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मेश्राम म्हणाले की, बेरोजगार व महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जपुरवठा केला जातो. मात्र, बॅंकांकडून कर्जाऊ रक्कम उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली जाते. यावर उपाय म्हणून अशा बॅंक व्यवस्थापकांची थेट भेट घेत, कर्ज नाकारण्याची नेमकी कारणे शोधून, ती दूर करण्यासाठी बरोजगार युवक आणि बॅंक प्रशासनाला सेलच्या वतीने मदत केली जाते. या माध्यमातून राज्यभरातील 70 बेरोजगार युवक व महिलांना कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. या मेळाव्यात औरंगाबाद जिल्ह्यातील गाढे जळगावच्या सरपंच मंडाबाई पडूळ आणि लायगावच्या सरपंच चंद्रकला गायकवाड यांनी रिपाइंच्या उद्योग सेलमध्ये प्रवेश केला. ख्वाजाभाई शेख यांनी सूत्रसंचालन केले. भारत बनसोडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)