रोजगार निर्मितीसाठी उद्योग वाढण्याची गरज

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर : केंद्राच्या नव्या उपक्रमामुळे 59 मिनिटांत कर्ज


सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सबलीकरण कार्यक्रम

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – रोजगार ही देशाची मोठी गरज असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. रोजगार निर्मितीला वाव मिळावा यासाठी हे उद्योग वाढण्याची गरज आहे. केंद्राच्या नव्या उपक्रमामुळे लघु आणि मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.

गणेश कला क्रीडा मंच येथे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या वतीने आयोजित सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सबलीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय न्याय विभागाचे सहसचिव सदानंद दाते, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक दत्तात्रय डोके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सल्लागार वसंतराव म्हस्के, प्रशांत खटावकर आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अहीर म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या उपक्रमामुळे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ऑनलाईन तेही केवळ 59 मिनिटांत मिळू शकते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 6 कोटी पेक्षा अधिक रोजगार आहेत. या उद्योगांना प्रोत्साहन देणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. भारत देश शेतीप्रधान आहे. येथील तरुणांच्या ठायी असलेल्या कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी “कौशल्य भारत’ आणि “मेक इन इंडिया’ हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. अन्य देशांनी भारताकडे बाजारपेठ म्हणून न पाहाता उत्पादकांचा देश म्हणून पाहावे, यासाठी सरकारने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

गृहउद्योग, ग्रामोद्योग, कुटीरउद्योग ही संकल्पना नवीन नसून जुनीच आहे. मात्र, त्याला या सरकारने फक्त चालना आणि गती दिली आहे. देशातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक साधन समृद्धीचा योग्य वापर झाला, तर देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही, असेही अहीर म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्‍के गुंतवणूक राज्यात होते. राज्यातील गुंतवणुकीच्या 60 टक्‍के पुण्यात होते. जिल्ह्यात 88 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामुळे उद्योग जगतात पुणे जिल्ह्याचे महत्त्वाचे स्थान आहे. मुद्रा योजनेमध्ये पुणे जिल्ह्यात 50 हजारांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जिल्ह्यातील 6 लाख लोकांना वितरीत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)