रोजगारीच्या आकडेवारीवरून मोदींची धोकेबाजी 

कॉंग्रेसने केली मोदींच्या मुलाखतीची चिरफाड 
नवी दिल्ली: देशातील रोजगाराच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आकडेवारी सादर करून देशाला धोका देत आहेत अशी टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे. पंतप्रधानांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत असल्याचा दावा केला होता त्यात त्यांनी जी आकडेवारी सादर केली आहे ती साफ बोगस असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मोदींच्या या मुलाखतीची चिरफाड केला. ते म्हणाले की या मुलाखतीत सरकारची तीन महत्वाची कामे कोणती असा प्रश्‍न मोदींना विचारण्यात आला होता पण त्यावर मोदींना भाष्य करता आले नाही असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. मी हे सांगू शकत नाहीं असे उत्तर पंतप्रधानांनी यावर दिले आहे त्यांचे तेवढे एकच उद्‌गार प्रामाणिकपणाचे आहेत असे त्यांनी म्हटले आहे. आपण देशात एक कोटी रोजगार निर्माण केले असे मोदी सांगतात त्याचवेळी देशात नोकऱ्याच नाहीत असे त्यांचेच एक कॅबिनेट मंत्री म्हणतात हा विरोधाभासही त्यांनी नजरेस आणून दिला.
मोदी सरकारची राजवट संपण्यास आता जेमतेम नऊ महिने शिल्लक राहले असून या अवधीत देशाला दाखवण्यासारखे एकही काम या सरकारने केलेले नाहीं. गेल्या 48 महिन्याच्या राजवटीत त्यांनी विविध विकास कामांची डेडलाईन 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचेच काम केले आहे. देशासाठी जे काहीं चांगले होईल ते 2022 मध्येच होईल असे मोदींनी सातत्याने सांगितले आहे.
मोदी सरकारने देशांतील आस्थापनांना कामगारांचे पीएफ खाते सुरू करण्याची सक्ती केली आणि त्यातून पीएफ खाती वाढली आणि त्याच आधारावर देशात नोकऱ्या वाढल्याचा दावा मोदी करीत आहेत असे ते म्हणाले. ज्यांची पीएफ खाती नव्याने उघडण्यात आली आहेत ते जुनेच रोजगार आहेत असेही त्यांनी नमूद केले. नोटबंदीमुळे देशातील 1 कोटी 26 लाख लोकांचे रोजगार बुडल्याची सीएमआयई संस्थेची आकडेवारी आहे असेही कॉंग्रेस प्रवक्‍त्याने निदर्शनाला आणून दिले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)