रोजगारासाठी तरुणांना “तयार’ करणार 

देशभर कौशल्य विकास संस्था उभारण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम 
तरुणांना उद्योजकतेचे प्रशिक्षण आणि भांडवलही मिळणार

नवी दिल्ली: देशातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर उद्योगांची संख्या जास्त आहे; परंतु या उद्योगासाठी गरज असलेली कौशल्य तरुणात नसल्यामुळे बेकारीचा आकडा वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने आता खाजगी भागीदारी (पीपीपी) मध्ये देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस) स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे, ठिकाणांची निवड मागणी आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यातून करण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने याअगोदरही तरुणांचे कौशल्य वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. या घडामोडीना आता संस्थागत रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात याचा परिणामकारक उपयोग होऊ शकणार असल्याचे सरकारला वाटते. याकामी कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्राला नेमके काय हवे आहे, याचा अंदाज धोरण तयार करणाऱ्यांना येऊ शकणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयआयएसच्या स्थापनेमुळे उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, उपयोजित संशोधन-शिक्षण आणि उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अर्थपूर्ण संबंध मिळाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता वाढीस लागेल. यामुळे देशभरातील तरुणांना कुशल प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळेल आणि उद्योग आणि जागतिक क्षेत्रातील स्पर्धात्मकतेशी जोडणीचा त्यांना फायदा मिळेल.
खाजगी क्षेत्राची उद्यमशीलता आणि जमिनीच्या रूपात सरकारी भागीदारी यांची सांगड घालून कौशल्य, नैपुण्य आणि स्पर्धात्मकता असलेल्या नवीन संस्था तयार होतील. त्याचबरोबर तरुणांना उद्योजकतेचे प्रशिक्षण व भांडवल उपलब्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)