रोजगारासाठी कामागारांचा शनिवारी मोर्चा

आदर्श जनरल कामगार संघटनेचा इशारा : स्थानिकांना डावलल्याचा आरोप

नगर – एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळाला आहे. कंपनी व्यवस्थापन स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही कार्यवाही नसल्याने आदर्श जनरल कामगार संघटनेने 19 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून यासंदर्भात निवेदन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एमआयडीसीमधील उद्योजकांना येथील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहे. मात्र येथील उद्योजक स्थानिक तरुणांना डावलून परप्रांतीय तरूणांना कामावर घेऊन स्थानिक कामगारांना डावलत असल्यामुळे येथील कामगारावर बेरोजगारीची व उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना रोजगार मिळावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदर्श जनरल कामगार संघटनेने दिला होता. या संघटनेच्या मागणीसाठी पाठिंबा वाढत आहेत. एकलव्य आदिवासी संघटना, सकल मराठा समाज, भीमरत्न सामाजिक प्रतिष्ठान (सोनई), जय जिजाऊ प्रतिष्ठान, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, भारतीय दलित महासंघ, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, सम्राट युवा प्रतिष्ठानने या मागणीसाठी पाठिंबा दिला आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात 15 जानेवारीपर्यंत स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला नाही, तर 19 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करणार, असे आदर्श जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सप्रे व पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. संजय शिंदे, सचिन वाघमारे, जयदीप शिंदे, हुसेन सय्यद, नीलेश आरडे, आकाश वायकर, सुनील उमाप, राहुल वाघमारे, सचिन शिंदे, योगेश आरडे, राहुल ठेंगडे, अरविंद गेरेंगे, सूरज धनवटे, उदय कर्डक, विपुल भोसले हे निवेदन देताना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)