रोजंदारी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी बाजार समिती रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचा इशारा बाजार समिती प्रशासक, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक
यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर संजय भालेराव, शरद काळे, संजय गरग, कुमार सोनवणे, दत्तात्रय खेडेकर, रणजित जगताप, रवींद्र ठाकरे आणि राजेश चव्हाण यांच्या सह्या आहेत. गेली अनेक वर्षे आम्हा रोजंदारी कामगारांकडून अत्यंत अल्पपगारात काम करून घेत आहात. अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या मुलभूत कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी आम्ही नाईलाजाने अन्याय सहन करत आहोत. कामावरून काढून टाकू, या धमकीमुळे आम्हाला संघटीत होण्यापासून अडविण्यात आले होते. आमचा
आत्मसन्मान, प्रतिष्ठा, सगळेच विसरून आमच्यावर असणाऱ्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे सर्व अपमान आम्ही सहन करत आलो आहोत. आता आमच्या श्रमाची अप्रतिष्ठा सहन करण्याच्या पलिकडे पोहोचली आहे. अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने आम्ही नाईलाजाने आंदोलनाची भूमिका घेतली असल्याची व्यथा  रोजंदारी कर्मचाऱ्यांनी निवेदतात मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)