रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवणारे घटक (भाग- २ )

जीवनसत्त्व-अ आणि बीटाकेरोटीन : हे संसर्गाशी लढा देणाऱ्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ करतात. आपले शरीर बीटाकेरोटीनला जीवनसत्त्व-अ मध्ये बदलतात. जीवनसत्त्व-अ मध्ये ऍण्टीऑक्‍सिडण्ट गुणधर्म असून ते रोगप्रतिकार शक्‍ती वाढवतात. कॅरोटेनॉड्‌स असलेली विविध फळे व भाज्यांचे सेवन करा, जसे आंबा, पपई, खरबूज, कलिंगड, गाजर, टोमॅटो, खजूर, ड्राईड ऍप्रीकोट्‌स, रताळे, राजगिरा पाने, बथुआ पाने, बीट पाने, खाण्याचे पान, अरबीची पाने, शेंगांची पाने, मेथीची पाने, सलाड, मोहरीची पाने, ओवा, मुळ्याची पाने व पालक.

जीवनसत्त्व-ब : जीवनसत्त्व-ब आपण सेवन करणा-या खाद्यपदार्थामधून ऊर्जा देते आणि आरोग्यदायी त्वचा, डोळे, यकृत व मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते हिमोग्लोबिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्‍यक आहे. जीवनसत्त्व-ब च्या अभावामुळे ऍनेमिया होण्यासोबतच थकव्यासारखी लक्षणे जाणवू लागतात. मुलांमध्ये ऊर्जा व अवधानाची कमतरता असेल तर त्याच्यामध्ये या जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो.

-Ads-

माशांमध्ये जीवनसत्त्व-बचे सर्वाधिक प्रमाण असल्यामुळे त्यांना माशांच्या सेवनामधून पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व-ब द्या. तसेच केळी, सूर्यफूल बिया, शेंगदाणे, पिस्ता, मांस व अंडी यामध्ये देखील जीवनसत्त्व-ब पुरेशा प्रमाणात असते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्‍तीमुळे सतत आजारी पडणे, कमी प्रमाणातील ऊर्जा पातळी, अपचन, निस्तेज त्वचा, चिडचिड ही फोलेटचा अभाव असल्याची काही लक्षणे आहेत. फोलेटचे संश्‍लेषक रूप फोलिक आम्ल (जीवनसत्त्व-ब 9) म्हणून ओळखले जाते.

माशांमध्ये फोलेट उच्च प्रमाणात असते आणि इतर उत्तम स्रेत आहेत मोहरीची पाने, पालक, कढीपत्त्याची पाने, ओवा, पुदिन्याची पाने, शतावरी, ब्रोकोली, बीट, आंबा, लिमा बीन्स (सेम्फली), डाळी व शेंगा, सोयाबीन, तीळ, मोहरी बिया, शेंगदाणे व अंडयातील पिवळा बलक.

मॅग्नेशिअम : मॅग्नेशिअम शरीरातील विविध रासायनिक क्रियांवर नियंत्रण ठेवते. ते मुलांचे पोट व पचनसंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे असून रोगप्रतिकार प्रणालीचे संरक्षण करते. या मिनरलकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या आहारामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी, गव्हाचे पीठ, मक्‍याचे पीठ, सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ, गार्डन क्रेस सीड्‌स, काळीमिरी, मोहरी बिया, शेंगदाणे, जिरे, कोंथिबीर बिया, वेलची, लवंग, ओवा, बदाम, काजू, अक्रोड, राजमा, छोले, चवळी, सोयाबीन, मटकी, उडीद डाळ, मूगडाळ, राजगिरा/रामदाना, राजगिरा पाने, कढीपत्ता पाने यांचा समावेश करा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)