रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवणारे घटक (भाग- १ )

झिंक : झिंक मुलांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढवत सामान्य सर्दी, अतिसार व श्‍वसनविषयक आजार कमी करण्यामध्ये मदत करते. ते जखम लवकर भरून निघण्यामध्येदेखील मदत करते आणि यामध्ये ऍण्टीऑक्‍सिडण्ट गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरातील पेशी व ऊतींचे मुक्त दूषित कणांमुळे होणारे नुकसान कमी करते. मुलांमध्ये झिंकचा अभाव असेल तर त्यांना संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो.

आहारामधून पुरेशा प्रमाणात झिंकचे सेवन झाले नाही तर पांढऱ्या रक्‍तपेशी व प्लेटलेट्‌सच्या संख्या कमी होऊ शकतात. भोपळ्याच्या बिया, कलिंगडच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया, खसखस, तीळ, ओवा व काजू हे झिंकचे चांगले स्रेत आहेत. इतर स्रेत आहेत धान्य, शेंगदाणे, डाळी व शेंगा, सोयाबीन, उकडलेल्या अंडयातील पिवळे बलक, बदाम, हलीम/अळीव, मोहरी (राई), जीरा, धणे, वेलची व मेथी.

-Ads-

जीवनसत्त्व-क : यामुळे पांढीया रक्‍तपेशी एकत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे संसर्गांचा सामना करण्यास शक्ती मिळते. जीवनसत्त्व-क सर्दीचा कालावधी व तीव्रता कमी करण्यामध्ये मदत करते आणि श्वसनमार्गातील संसर्गावर (आरटीआय) नियंत्रण ठेवते. ते हाडे व स्नायूंमध्ये कोलेजन तयार करते आणि जखम लवकर भरून निघण्यामध्ये मदत करते. तसेच ते दात व हिरडया आरोग्यदायी ठेवते.

जीवनसत्त्व-क चे लाभ मिळण्यासाठी मुलांनी ओवा, शिमला मिरची (हिरवी, पिवळी, लाल), काळ्या मनुका, पेरू, आवळा, स्ट्रॉबेरी, किवी, लिंबू, मोसंबी, संत्री, चिंच, पपई, कैरी, पपनस, मुळा, राजगि-याची पाने (मठ/चौलाई), बथुआ, अरबीची पाने, शेंगा व त्याची पाने, मेथीची पाने, मोहरीची पाने, गांठगोभी, कोबी, हिरव्या मिरच्या, फुलकोबी, कारले व ब्रोकोली यांचे सेवन केले पाहिजे. मुलांना कच्ची फळे व भाज्या किंवा काहीशा प्रमाणात भाजलेल्या भाज्या खाण्यास सांगा. कारण, शिजवताना यामधील आवश्‍यक जीवनसत्त्व निघून जातात.

जीवनसत्त्व-ड : जीवनसत्त्व-ड रोगप्रतिकारक शक्ती प्रबळ करते आणि संसर्गाशी प्रभावीपणे लढा देते. जीवनसत्त्व-ड चे पुरेशा प्रमाणात सेवन स्वयंप्रतिरोधक आजार होण्याला प्रतिबंध होतो. जीवनसत्त्व-ड शोषून घेण्यासाठी मुलांचे आतडे आरोग्यदायी असले पाहिजे. दूषित अन्नामुळे आतडे बिघडले असेल तर जीवनसत्त्व-ड शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो. आहारातील जीवनसत्त्व-ड मिळण्याचे चांगले स्रोत आहेत अंडी आणि बांगडा, तार्ली व रावस यांसारखे मासे.

जीवनसत्त्व-ई : जीवनसत्त्व-ई त्याच्यामधील ऍण्टीऑक्‍सिडण्ट गुणधर्मांमुळे आपल्या शरीरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ते पर्यावरणीय व मुक्त दूषित कणांपासून पेशी व ऊतींचे संरक्षण करते. जीवनसत्त्व-ई च्या अभावामुळे नैसर्गिक किलर पेशींच्या संख्येमध्ये घट होते. परिणामत: मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. जीवनसत्त्व-ई मिळण्याचे चांगले स्रेत आहेत सूर्यफूल बिया, बदाम, अक्रोड, पिस्ता, व्हीट जर्म व वनस्पती तेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)