रोख रक्कम साठवणाऱ्यावर प्राप्तिकर विभागाची कारवाई

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैशांचा तुटवडा असल्याचे समोर आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने रोख रक्कम साठवणाऱ्यावर कारवाई केली आहे. जवळपास 14.48 कोटींची रक्कम जप्त केली आहे. प्राप्तकिर विभागाने या दिशेने पाऊल टाकत आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाबसारख्या विविध भागांत छापेमारी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तकिर विभागाने व्यक्ती आणि व्यापाऱयांच्या ठिकाणांवर छापे मारले. जप्त करण्यात आलेल्या 14.48 कोटी रूपयांच्या रक्कमेमध्ये 2000 रूपयाच्या नोटा आणि 500 रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. हैदराबादमधील रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या इथे छापेमारीत 5.10 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच पंजाबमधल्या खन्ना जिल्हय़ात केलेल्या छापेमारीत 5.62 कोटी रूपये जप्त केले आहेत. कर्नाटकातल्या पीडल्ब्यूडीच्या ठेकेदारांकडून पैसे जप्त करण्यात आले आहेत. या ठेकेदारांना जानेवारी-मार्चदरम्यान ठेके देण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)