रोख रकमेसह लॅपटॉप चोरीला

पिंपरी – आकुर्डी येथे मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास ज्ञानेश्वर कॉलनी येथे घडली.

ओमप्रकाश लवकुश सोनी (वय-34, रा. सिद्धी रेसिडेन्सी, स्पाईन रोड, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

ओमप्रकाश यांचे जय मोबाईल शॉपी नावाचे मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता ओमप्रकाश यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा मागील दरवाजा कटावणी व स्क्रू ड्रायवरच्या सहाय्याने उचकटून दुकानात प्रवेश केला.

दुकानातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि 12 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप असा एकूण 17 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)