नवी दिल्लीः   देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या रोख रकमेचा तुटवडा जाणवतो आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. ‘देशातील काही भागांमध्ये रोख रकमेची मागणी जास्त असल्याने इतर भागांमध्ये चणचण जाणवी लागली आहे. देशातील बाजारात सध्या गरजेपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध आहे,’ असं जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री प्रसाद शुक्ल यांनी नोटांचा तुटवडा तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल, अशी माहिती दिली. ‘काही भागांमध्ये नोटांची चणचण जाणवत आहे. नोटांचा तुटवडा असलेल्या भागांमध्ये लवकरच चलन पुरवठा केला जाईल,’ असे शुक्ल यांनी सांगितले. ‘सध्याच्या घडीला आमच्याकडे 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची रोकड आहे. काही राज्यांमध्ये जास्त रोकड असल्याने समतोल बिघडला आहे. त्यामुळेच सरकारनं राज्य स्तरावर एक समिती स्थापना केली आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली. नोटांची कमतरता असलेल्या भागांमध्ये तीन दिवसांमध्ये नोटांचा पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)