रोखपालाकडून ज्येष्ठ महिलेला 1 कोटी 88 लाखांची फसवणूक

बॅंकेच्या माजी रोखपालाकडून ज्येष्ठ महिलेला 1 कोटी 88 लाखांची फसवणूक
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.25 – एचडीएफसी बॅंकेच्या माजी रोखपालाकडून एका महिला ग्राहकाची 1 कोटी 88 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्याने संबंधित रोखपालाला अटक केली आहे.
याप्रकरणी एका 59 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार निरज प्रभाकर टिळक (45, रा. नारायण पेठ) याला अटक केली आहे. निरज याने फिर्यादी महिलेचा विश्‍वास संपादन करून व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारासाठी मदत करतो असे सांगितले होते. मदतीच्या बहाण्याने त्याने महिलेच्या बॅंकेतील सहा धनादेशावर घरी जाऊन सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या बॅंक खात्यातून 1 कोटी 88 लाख रुपये स्वत:च्या एचडीएफसी बॅंकेतील खात्यावर वर्ग करून घेतले. तसेच फिर्यादीच्या परवानगीशिवाय त्यांच्या बॅंक अकाऊंटला त्याने मेल आयडी लिंक केले आहे. ही फसवणूक सन 2017 पासून करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (सायबर क्राईम सेल) गजानन पवार तपास करत आहेत.
यासंदर्भात माहिती देताना पवार म्हणाले, ही ज्येष्ठ महिला घरी एकटीच रहाते. ती घरगुती कॅस्मेटीकचा व्यवसाय करते. एचडीएफसी बॅंकेत खाते असल्याने तिची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपीने आर्थिक व्यवहारासाठी मदत करतो असे सांगितले होते. वयामुळे जास्त घराबाहेर पडता येत नसल्याने फिर्यादी महिलेने काही व्यवहाराचे धनादेश त्याच्याकडे दिले होते. त्याचा गैरवापर करून त्याने 1 कोटी 88 लाखाची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग केली होती. आरोपीने दोन वर्षापूर्वी एचडीएफसी बॅंकेच्या कोरेगाव पार्क शाखेतील रोखपालाची नोकरी सोडली आहे. तो सध्या कन्सलटींगचा व्यवसाय करतो. दरम्यान तो गावी गेल्यावर महिलेला पैशाची गरज लागल्याने ती बॅंकेत आली होती. तेव्हा महिलेला खात्यामध्ये फक्त 20 हजाराची रोकड शिल्लक असल्याचे लक्षात आले. यानंतर सायबर क्राईम सेलकडे अर्ज तक्रार दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)