रोकड लुटीत फिर्यादीच निघाला आरोपी

कंपनीला धडा शिकविण्यासाठी केला चोरीचा बनाव
 
संगमनेर – एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या सिसको कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारा पगार कमी असल्याने त्यात उदरनिर्वाह करणे शक्‍य होत नव्हते. त्यातून कंपनीला धडा शिकविण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवून 36 लाखांची रोकड लुटल्याच्या प्रकरणाचा बनाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी याबाबत फिर्याद दिली होती. ते आरोपी निघाले आहेत. संगमनेर पोलिसांनी अवघ्या सहा तासात या गुन्ह्याचा छडा लावून लुटीचा प्रकार बनाव असल्याचे स्पष्ट केले.

एटीएमला पैसे पुरविणाऱ्या खाजगी कंत्राटदाराच्या दोन प्रतिनिधींना बंदूकीचा धाक दाखवून सुमारे 36 लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना तालुक्‍यातील वडगाव लांडगा शिवारात घडली. याबाबत मंगेश रमेश लाड या सिसको कंपनीच्या कर्मचाऱ्याने स्वतः तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रात दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक आश्‍विनी टिळे, सहायक फौजदार अनिल मोरे, गोविंद खरात, परमेश्‍वर गायकवाड, लक्ष्मण औटी, एम.एन. जाधव, बाबासाहेब खेडकर, राजू खेडकर यांनी पथक तयार करून तपासाची सूत्रे हलविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तपासाअंती गुन्ह्यातील फिर्यादीच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार फिर्यादी मंगेश रमेश लाड (वय-29 रा. चास ता. सिन्नर) तसेच साक्षीदार दत्त सोनू पांडे (वय-40 रा. घुलेवाडी संगमनेर) यांची कसून चौकशी केली असता कंपनीकडून त्यांना कमी वेतन मिळत असल्याने त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत नसल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे त्यांनी त्यांचा साथीदार सिताराम सुभाष शिंदे (वय-40 रा. इंद्रायणी कॉलनी, घुलेवाडी, ता.संगमनेर) याच्या मदतीने लुटीचा बनाव केल्याचे यावेळी पोलिसांना सांगितले. त्यामुळे गुन्हा घडल्याच्या अवघ्या सहा तासात पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यात यश आले. पोलिसांनी आरोपींचा साथीदार सिताराम शिंदे याच्याकडून 32 लाख 94 हजारांची रोकड हस्तगत केली आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)